
Ambabai Temple AI System
esakal
एआय तंत्रज्ञानाचा वापर:
यंदा नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात प्रथमच एआय-सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा बसवली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार ओळखणे, त्यांच्या चेहऱ्याचे साम्य टक्केवारीत दाखवणे आणि तत्काळ पोलिसांना माहिती देणे अशी व्यवस्था आहे.
गर्दीचे नियोजन:
मंदिरातील १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील माहिती एआयकडे हस्तांतरित केली जाते. हिट मॅपिंगद्वारे भाविकांची गर्दी लाल, भगवा, पिवळा, हिरवा रंग वापरून दाखवली जाते व सुरक्षा रक्षकांना गर्दी हलती ठेवण्यासाठी सूचना मिळतात.
चोरी रोखण्यात यश:
या एआय देखरेखीतून काल एका महिलेला दर्शनरांगेत चोरी करताना ओळखून ती बाहेर पडताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
Ambabai Temple AI Surveillance : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात एखादा रेकॉर्डवरील गुन्हेगारांने कोठूनही प्रवेश केला की त्याचा फोटो सीसीटीव्ही कॅमेराने घेतला की तत्काळ एआय त्याच्या गुन्ह्यांची माहिती ‘स्क्रीनवर’ दाखवते. तो व्यक्ती आणि गुन्हेगार याच्या चेहऱ्यातील साधर्म्य किती आहे, याची टक्केवारीही स्क्रिनवर दिसते आणि तत्काळ याची माहिती पोलिस यंत्रणेकडे कळवली जाते. या तंत्रज्ञानामुळे कालपासून सुमारे आठ ते दहा रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा मंदिरातील वावर टिपला आहे.