esakal | मंत्री सतेज पाटील यांनी दिले आदेश आणि त्यांना मिळाले घर

बोलून बातमी शोधा

After 13 years they get their house

बनावट मृत्यूपत्राच्या आधारे बळकावलेल्या घराचा ताबा तब्बल 13 वर्षानंतर मूळ वारसदारांना मिळाला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयितांनी सद्विवेक बुध्दीने आज याबाबतची नोटरी केली. नोटरीची कागदपत्रे वारसदारांच्या ताब्यात दिली.

मंत्री सतेज पाटील यांनी दिले आदेश आणि त्यांना मिळाले घर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - बनावट मृत्यूपत्राच्या आधारे बळकावलेल्या घराचा ताबा तब्बल 13 वर्षानंतर मूळ वारसदारांना मिळाला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयितांनी सद्विवेक बुध्दीने आज याबाबतची नोटरी केली. नोटरीची कागदपत्रे वारसदारांच्या ताब्यात दिली. याबाबतची माहिती पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली. 

हे पण वाचा -  दुर्दैवी, खेळता खेळता चिमुकली ट्रकखाली आली आणि... 

कोल्हापूरात पालक मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थीतीत झालेल्या लोकशाही दिनात श्रीमती लक्ष्मी उर्फ शांताबाई दशरथ तांबेकर (वय 58, रा. सम्राट अशोकनगर) यांनी तक्रार केली होती. त्याचा तपास पोलिस उपअधिक्षक बिरादार यांनी करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गावभाग पोलिसांना दिले होते. 

याबाबत गावभाग पोलिसांत श्रीमती तांबेकर यांच्या तक्रारीवरुन सुनिल रामा पाटील (रा.कंग्राळगल्ली, बेळगाव), अशोक शामराव ठोमकणे, पंकज अशोक ठोमके, अंजना अशोक ठोमके (सर्व रा.जयसिंगपूर) यांच्या विरोधात विविध 15 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता.

हे पण वाचा - रस्ता ओलांडतानाच त्यांच्यावर काळाचा घाला

 तक्रारदार श्रीमती तांबेकर यांची मयत भावजय श्रीमती प्रमिला बंडू कामते यांच्या मालकीचे घर सुनिल पाटील यांनी बेळगाव येथे 3 एप्रिल 2007 रोजी बनावट खोटे मृत्यूपत्र तयार करुन घेतले. त्यानंतर त्या घरावर आपला हक्क सांगत खोट्या कागदपत्रांच्या आधारे नगर भूमापन कार्यालयात कागदोपत्री आपले नाव लावून घेतले. 
न्यायालयास बनावट मृत्यूपत्र खरे आहे, असे भासवून मृत्यूपत्राच्या आधारे सुनिल पाटील यांनी हे घर अशोक ठोमके व पंकज ठोमके यांच्या नावावे कायम खुश खरेदीचे करारपत्र करुन त्याची नोटरी केली. यातून मूळ वारसदारांना घरापासून वंचित ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. 
या गुन्ह्यातील तपासामध्ये घर विकत घेणारे अशोक ठोमके यांनी मूळ वारसदारांना घर परत देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार त्यांनी याबाबतची आज नोटरी करुन संबंधित घर मूळ वारसदार श्रीमती तांबेकर, हणमंत नागोजी कामते, रघुनाथ नागोजी कामते यांच्या ताब्यात दिले. त्यामुळे गेल्या तेरा वर्षापासून घरासाठी सुरु असलेल्या श्रीमती तांबेकर यांच्या संघर्षाला आज पूर्णविराम मिळाल्याचे बिरादार यांनी सांगितले.