
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मीपुरी मंडईत मात्र गर्दीच गर्दी होती. बिंदू चौकाकडून आईसाहेबांच्या पुतळ्याकडे जाणारा मार्ग खोदाईसाठी बंद असल्याने सर्व वाहतूक शिवाजी पुतळामार्गे वळविली होती, त्यामुळेही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन (lockdown) रात्री संपताच सोमवारी सकाळी सात ते अकरा दरम्यान ग्राहकांनी (Customer) खरेदीसाठी झुंबड उडविली. भाजीपाल्यासह धान्य, आंबे, चक्क वडापाव घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली (Customers crowded) होती. अनेक ठिकाणी धान्य भाव दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. कडक लॉकडाऊन (lockdown) शिथिल झाल्यामुळे बाजारात जी गर्दी होते. त्यावरून लोकांना तुम्हीच सुपर स्प्रेडर होणार का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. म्हणून लोकांनीही स्वतः आत्मचिंतन करून लॉकडाऊन नको असेल तर कोरोनाचे नियम पाळण्याची गरज आहे. (after eight days of lockdown in kolhapur district, the market was crowded with customers)
शहरातील मुख्य बाजार असणाऱ्या ठिकाणी भाजीपालासह इतर विक्रीसाठी बंदी घातली आहे, मात्र रस्त्याच्याकडेला थांबून विक्री करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना परवानगी आहे. परिणामी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर गर्दी जाणवत होती. शिंगोशी मार्केट परिसरातील फुलबाजार सोमवारी मिरजकर तिकटी परिसरातील रस्त्यावरच भरला होता. सकाळच्या टप्प्यात 20-25 रुपये पावशेर मिळणारा गलाटा साडेनऊ दहानंतर ३० ते ४० रुपये केला. कोळेकर तिकटी मिरजकर तिकटी याठिकाणी पोलिस थांबून रस्त्याकडील पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेरच विक्रीसाठी थांबू देत होते.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मीपुरी मंडईत मात्र गर्दीच गर्दी होती. बिंदू चौकाकडून आईसाहेबांच्या पुतळ्याकडे जाणारा मार्ग खोदाईसाठी बंद असल्याने सर्व वाहतूक शिवाजी पुतळामार्गे वळविली होती, त्यामुळेही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मुख्य लक्ष्मीपुरी बाजारात मात्र पोलिस पोलिस दिसत होते, ज्या ठिकाणी अधिक गर्दी होत होती. राजारामपुरी परिसरातील आईचा पुतळा परिसरात नार्वेकर मार्केटमधील विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा विक्रीसाठी बसले होते. त्या परिसराची ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. शहरातील ठिकाणी कोपऱ्यावर आंबे विक्रेत्यांनीही गर्दी होती. काही भाजी विक्रेत्यांनी उपनगरातही भाजीचे स्टॉल उभे केले होते.
...तर पुन्हा लॉकडाऊन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊन शिथिल केला, की लोकांची दुसऱ्या दिवशी खरेदीसाठी गर्दी हे समीकरण ठरलेले आहे. खरचं आपल्याला आजच भाजीपाला हवा का ? विनाकारण रस्त्यावर फिरू का? रोज काही ना काही कारण शोधून घराबाहेर पडू का ? असे प्रश्न आता लोकांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. रोज होणाऱ्या गर्दीत कोरोनाचे नियम पाळले जातात का? कारण रोज भरणारी ही जत्राच कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. पुन्हा रूग्ण वाढले, त्यातून मृत्युची संख्या वाढली तर लॉकडाऊन अटळ आहे.
रेशन दुकानावर रांगा
जिल्ह्यातील सर्व रास्त भाव रेशन दुकानावर धान्य उपलब्ध झाल्याने ते घेण्यासाठी रांगा दिसत होत्या. अनेक महिला या रांगेत हातात पिशव्या घेऊन उभारल्याचे चित्र होते, मात्र सर्व दुकानांसमोर सोशल डिस्टन्स दिसून येत होता.
(after eight days of lockdown in kolhapur district, the market was crowded with customers)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.