
सांगलीतील आष्टा येथे दुचाकी अपघातात दोघेजण ठार
esakal
हायलाइट्स
आष्टा-बागणी रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकी अपघातात आष्टा येथील दोन तरुणांचा मृत्यू.
ओम धर्मेंद्र शेडबाळे (२२) याचा जागीच मृत्यू; संदीप बाजीराव पाटील (३०) उपचारादरम्यान मृत्यूमुखी.
स्वप्नील संजय बागणे जखमी; आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू.
Sangli Acccident Death News : आष्टा-बागणी रस्त्यावर दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत आष्टा येथील दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. ओम धर्मेंद्र शेडबाळे (वय २२, आष्टा ता. वाळवा) व संदीप बाजीराव पाटील (३०, बावची रोड आष्टा ता. वाळवा) अशी या तरुणांची नावे आहेत. या अपघातात स्वप्नील संजय बागणे हा जखमी झाला आहे. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात बाबासाहेब कुमार वाडकर (वय ३९, मेन रोड आष्टा ) यांनी फिर्याद दिली आहे.