after ganesh visarjan establishment of ganesh murti in villages in belgum
after ganesh visarjan establishment of ganesh murti in villages in belgum

विसर्जनानंतरही गणेशाची होते पुनर्प्रतिष्ठापना ; आनोख्या परंपरेच हे गाव

खानापूर : गणेशोत्सवात केवळ अकरा दिवस पुजले जाणारे गणराय खानापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम घाटात वर्षभरासाठी गाव व जंगलाचे रक्षणकर्ते बनतात. जांगळीचा देव बनून ते गावच्या वेशीवर वर्षभर स्थिरावतात. विसर्जनानंतर एका श्रीमूर्तीची वेशीबाहेर विशिष्ट ठिकाणी प्रतिष्ठापना करण्याची अनोखी परंपरा या भागातील काही गावांत आहे.

पश्‍चिम घाटातील कणकुंबी परिसरात गणेश चतुर्थी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. अकरा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गावातील सर्वच मूर्तींचे विसर्जन एकाचवेळी वाजतगाजत केले जाते. गावाजवळच्या ओढ्यात किंवा नदीत गणरायाचे विसर्जन केले जाते. इथपर्यंतच्या चालिरीती सगळीकडेच आहेत. पण, कणकुंबी, पारवाड, चिखले, चिगुळे, हुळंद, चोर्ला, मान, आमगावसह काही गावांत विसर्जनानंतर एक आकर्षक मूर्ती पाण्यातून बाहेर काढली जाते. त्या मूर्तीची सर्वजण पूजा करतात.

पुन्हा त्याच उत्साहात ती मूर्ती गावच्या वेशीवर विशिष्ठ ठिकाणी पुनर्प्रतिष्ठापित केली जाते. त्यानंतर हा गणराय त्या गावचा, जंगलाचा आणि गुराख्यांचा रक्षणकर्ता बनतो, अशी श्रद्धा आहे. शक्‍यतो हा जांगळीचा देव कुडाच्या झोपडीत विसावलेला दिसतो. ही परंपरा कधी व कुणी सुरु केली याबाबत कुणाला माहिती नाही. अलीकडच्या काळात नवी हुळंद हे गाव निर्माण झाले. या गावानेही ही परंपरा सुरू केली.

दाट जंगलात असलेल्या गावांत ही परंपरा पाहायला मिळते. त्याला गुराख्यांचा देव मानतात. गणराय जंगलात जाणाऱ्या गुराख्यांचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करतो, अशी भावना आहे. 
वर्षातून एकदा या देवाची महापूजा केली जाते, अशी माहिती कणकुंबीतील दीपक वाडेकर यांनी दिली. कुणी गणरायाला शेती व शेतकऱ्यांचा तर कुणी गावचा राखणदार समजतो. पण, या भागातील लोकांची या देवावर श्रध्दा आहे, अशी माहिती चिखलेतील अजित गावडे यांनी दिली.

"तीस वर्षांपूर्वी नवी हुळंद गाव अस्तित्वात आले. तेव्हा परंपरेप्रमाणे ग्रामस्थांनी गणेश विसर्जनानंतर गावापासून जवळच झोपडी बांधून जांगळीचा देव बसविला. हा देव गावची राखण करतो. संकटापासून वाचवितो. संकटांना गावात शिरू देत नाही, अशी आमची भावना आहे."

- सावित्री गावडे, नवी हुळंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com