
Kolhapur Cooperative Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मध्ये आता सहकारातील ‘सर्वपक्षीय’ चा पॅटर्न आणला जात आहे. २१ वरून २५ संचालक करण्यामागे हाच हेतू असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील सहकारी संस्थांत विरोधकच राहू नये, अशी स्थिती सर्वपक्षीय नेत्यांनी तयार केली आहे. हाच पॅटर्न ‘गोकुळ’मध्ये येण्यासाठी आणखी चार संचालक वाढविणे आवश्यक होते. त्याची पोटनियम दुरुस्ती आता संचालक मंडळात मंजूर झाली आहे.