

आमदार यड्रावकरांनंतर आता राहुल आवाडेंच्या साखर कारखान्याची ऊस वाहतूक अडवली
esakal
Kolhapur Sugarcane Protest : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दरावरून आंदोलन पेटले आहे. शिरोळ तालुक्यात उसाने भरलेली वाहने पेटवून देण्याचा प्रकार घडला तर आंदोलन अंकुशकडून आमदार यड्रावकरांच्या साखर कारखान्यावर सलग दोन दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान हातकणंगले तालुक्यातील हुपरीमधील जवाहर सहकारी साखर कारखान्याचा उसाने भरलेल्या ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अडवण्यात आला. दरम्यान स्वाभिमानी पदाधिकारी आणि संचालक यांच्यात चर्चा झाल्यानंतर वाहन सोडण्यात आले.