Kolhapur IT Park : अधिवेशन संपल्यानंतर कोल्हापूरच्या आय.टी. पार्कसाठी मुंबईत बैठक

Rajesh Kshirsagar : आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबाबतचा प्रश्‍न उपस्थित करून बैठकीची मागणी केली. यावेळी नाईक यांनी सांगरुळ येथील वनजमीन निर्वनीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
Kolhapur IT Park
Kolhapur IT Parkesakal
Updated on

IT Park Kolhapur : शेंडा पार्क येथील आय. टी. पार्कसाठी पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मुंबईत बैठक घेण्याचे आश्‍वासन उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज अधिवेशनात दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबाबतचा प्रश्‍न उपस्थित करून बैठकीची मागणी केली. यावेळी नाईक यांनी सांगरुळ येथील वनजमीन निर्वनीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर क्षीरसागर यांनी बैठक घेण्याचे आदेश व्हावे, अशी मागणी केली. यानंतर विधिमंडळ तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी आदेश दिले. अखेर बैठक घेण्याची ग्वाही मंत्री नाईक यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com