
कोल्हापूर : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कृषिपंपाच्या केबल चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. विजय मधुकर गुरव (वय ३२, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) असे एकाचे नाव आहे. तर दुसरा संशयित अल्पवयीन असल्याचे समोर आले. केबल चोरीचे दोन व मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.