
जयसिंगपूर : मुबलक मॉन्सूनपूर्व पावसामुळे येत्या पंधरवड्यात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारली जाऊ नये, यासाठी तालुका कृषी विभागामार्फत विशेष दक्षता घेतली आहे. बनावट बियाणे विक्रीविरोधात पथके तैनात केली असून, विक्रेत्यांनाही कारवाईचा इशारा दिला आहे.