

Agriculture Officer Dies in Accident While Saving Child
esakal
Tragic Accident News : लहान मुलगा आडवा आल्याने त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात हुपरी विभागाचे उपकृषी अधिकारी राहुल कुलकर्णी (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. ४) हेरले (ता. हातकणंगले) माळभाग फाट्यावर झाला होता. उपचार सुरू असताना गुरुवारी (ता. ८) रात्री त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.