पोलिसांनीच खड्डे बुजविल्याने आजरा बांधकाम विभागाला आली जाग 

In Ajara, The Police Filled The Pits Kolhapur Marathi News
In Ajara, The Police Filled The Pits Kolhapur Marathi News
Updated on

आजरा : खड्डयातून गाडी गेल्यावर अनेकदा प्रवाशांकडून संबंधीत खात्याचा उध्दार होतो. ही सर्वसामान्यांची सहज प्रतिक्रीया. पण त्यातून प्रश्‍न राहतो जैसे थे ! आजऱ्यात चार दिवसांपुर्वी मात्र वेगळे घटले. रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्यासाठी दस्तुरखुद्द पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागला. यामुळे संबंधीत खात्याला जाग आली. पण, खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी हाती घेतलेली मोहीम तात्पुरती मलमपट्टी ठरू नये, अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे. 

कोल्हापुरहून गोव्याला जाणारा जवळचा मार्ग म्हणून आजरा-आंबोली मार्गाची ओळख आहे. या मार्गावर रहदारी जास्त असते. त्यामुळे तो मार्ग महत्वाचा ठरला आहे. पण या मार्गावर देवर्डे फाटा, माद्याळ फाटासह अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने सतत अपघाताला निमंत्रण मिळते. किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात या काही दिवसात झाले असून वाहनधारकांत वादाचे प्रसंग घडले. त्यामुळे या मार्गाची दुरुस्तीबाबत सातत्याने विचारणा होत होती. 

हा मार्ग रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याने याच्या दुरुस्तीचा प्रश्‍न उपस्थित होवू लागला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास एकमेकांकडे बोट दाखवत असतात. त्याचबरोबर खडुे बुजवण्यासाठी निधीची उपलब्धता हा ही प्रश्‍न असल्याचे सांगण्यात येते. आजरा-गडहिंग्लज मार्ग मार्गावरील व्हिक्‍टोरीया पुलानजीक पडलेल्या खड्डयाचा अंदाज येत नसल्याने गाड्यांच्या अपघाताचे सत्रच सुरू झाले.

चार दिवसांपुर्वी तर चार चाकीचा अपघात झाला. त्यामुळे वाहातुक ठप्प झाली. मग हा खड्डा मुजवण्यासाठी पोलिसांनाच पुढाकार घेतला. ये- जा करणाऱ्यांना प्रवाशांनीहा मदत केली. या घटनेनंतर बांधकामने खड्डे बुजवण्याची मोहीम राबविली. आता कोणीतरी पुढाकार घेतल्यानंतर बांधकामाला याचे गांभीर्य कळते का? अशी विचारणा वाहनधारकातून होत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com