
Kolhapur NCP Workers Entry : ‘जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह करवीर आणि राधानगरी तालुक्यांतील २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश मेळावा सोमवारी (ता. २५) सडोली खालसा (ता. करवीर) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असून त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले.