Rare Medicinal Plants in Ajra Amboli
esakal
आजरा : आजरा तालुका हा आंबोली परिसराला जोडून आहे. हा परिसर सह्याद्रीच्या रांगा व उपरांगात (Ajra medicinal plants) येतो. येथील जैवविविधता समृध्द असून, शेकडो प्रकारच्या दुर्मीळ औषधी वनस्पतींचे अस्तित्व आढळते. याच्या नोंदी विविध संशोधन संस्थांनी घेतल्या आहेत. वनस्पतींचे संवर्धन व जतनाची गरज आहे. शासनस्तरावर व्यापक पातळीवर पावले उचलण्याबरोबर, नागरिक, शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थांच्या जनजागृतीची आवश्यकता आहे.