

Kolhapur Election
sakal
आजरा: आजरा नगरपंचायतीची निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढवली जाणार नसल्याचे स्पष्ट आहे. नेत्यांकडून आघाड्यांसाठी वाटाघाटी सुरू असल्या तरीही त्यांच्या सोयीच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तालुक्याच्या राजकारणात प्रतिस्पर्धी असलेले नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात या वेळी एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय संदर्भ बदलणार असल्याचे दिसते.