

Kolhapur Ajra drowning case hiranyakeshi river
esakal
Kolhapur Drowning Death : (रणजीत कालेकर) : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका येथील हिरण्यकेशी नदीवरील हिरलगे-कोवाड बंधाऱ्यावर रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मामा व भाच्याचा बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सुनील विष्णू सुतार (वय ५०, रा. कोवाड) आणि त्यांचे भाचे प्रवीण पांडुरंग सुतार (वय ३६, रा. वाळकी, ता. चिकोडी) यांचा समावेश आहे.