esakal | शेळोली, नांदोलीत दारूसाठा जप्त : एकास अटक

बोलून बातमी शोधा

शेळोली, नांदोलीत दारूसाठा जप्त : एकास अटक
शेळोली, नांदोलीत दारूसाठा जप्त : एकास अटक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गारगोटी (कोल्हापूर) : भुदरगड पोलिसांनी शेळोली, नांदोली येथे छापा टाकून बेकायदेशीररित्या केलेला ४५ हजार रूपयांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक केली. पोलिस निरीक्षक संजय मोरे व पोलिसांनी ही कारवाई केली.

शेळोली येथे गोवा बनावटीच्या बेकायदेशीर साठ्यावर छापा मारून चाळीस हजाराचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी भरत दयानंद चव्हाण (रा. म्हासरंग) या युवकास अटक केली. केळुस्कर यांच्या जनावारांच्या गोठ्यात गोवा बनावटीचा बेकायदेशीर दारू साठा केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलीसानी छापा मारून वेगवेगळ्या कंपनीचा मद्यसाठा जप्त केला.

नांदोली येथे विठ्ठल विनायक बागडी हा घराच्या पाठीमागे विदेशी दारु विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. तेथे छापा टाकून ५ हजार ३०० रूपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.