
Kolhapur Sangli Flood : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज धरण प्रशासनाने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे धरण अवघ्या महिनाभरात ८० टक्के भरले आहे.