
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील ज्या निशिधिकेजवळून ‘महादेवी हत्तीणी’ला वनताराच्या पथकाने ताब्यात घेतले, तेथूनच रविवारी (ता. ३) पहाटे पाच वाजता श्री चक्रेश्वरी मातेची आरती करून पुन्हा महादेवीला परत आणण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय समाज बांधव आणि महादेवीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत नांदणीतून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पदयात्रेद्वारे कूच केले. निशिधिका-माणगांवेकोडीहून पदयात्रा कोल्हापूर-सांगली महामार्गावर आली.