गडहिंग्लजच्या रिंगरोडसाठी सर्वपक्षीय एकत्र

All Party Together For The Ringroad Of Gadhinglaj Kolhapur Marathi News
All Party Together For The Ringroad Of Gadhinglaj Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : मुख्य रस्त्यांसह अंतर्गत प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीच्या कोंडीने शहरवासीयांचा श्‍वास गुदमरत आहे. अनेक वर्षापासूनचा शहर हद्दवाढीचा प्रश्‍नसुद्धा सर्वपक्षीयांच्या ताकदीनेच गडहिंग्लजकरांनी तडीला नेला आहे. आता याच धर्तीवर शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी रिंगरोड पूर्णत्वाला नेण्यास ताकद पणाला लावण्याचा निर्धार आज येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी केला. दरम्यान, हा प्रश्‍न सुटेपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापनाही या वेळी करण्यात आली. याची पुढील बैठक 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

भविष्यातील वाहतुकीचा मोठा ताण कमी करण्यासाठी शहराला रिंगरोडशिवाय पर्याय नाही. यामुळे या प्रश्‍नाला तोंड फोडून रिंगरोडच्या पूर्णत्वासाठी सर्वपक्षीयांची ताकद आवश्‍यक असल्याचे बैठकीचे निमंत्रक प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रारंभीच सांगितले. यशवंत बझारमध्ये ही बैठक झाली. त्यानंतर बैठकीत प्रा. किसनराव कुराडे, किरण कदम, बसवराज आजरी, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, नागेश चौगुले, डॉ. एम. एस. बेळगुद्री, दिलीप माने, रश्‍मीराज देसाई, अशोक खोत, विश्‍वास खोत, निवृत्त नगर अभियंता सयाजीराव भोसले यांनी विविध सूचना केल्या. 

वीस वर्षापासून हा प्रश्‍न भिजत पडला आहे. सात पैकी केवळ दोन किलोमीटर रस्ता पूर्ण झाला आहे. अर्धवट स्थितीतील हा रस्ता पूर्णत्वाला नेणे आवश्‍यक आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्याच्या निधीसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. तत्पूर्वी नगरपालिका, नगररचना विभागाकडे रस्त्याची तांत्रिक माहिती घेण्याचा निर्णय झाला.

जमीन मालकांना विश्‍वासात घेऊनच रिंगरोडसाठी प्रयत्न करण्याचे ठरले. मालकांची संमत्ती असेल तरच रस्ता होणार आहे. सध्या शासनाकडून भूसंपादनासाठी निधी मिळणे अशक्‍य आहे. त्यामुळे जमीन मालकांसमोर टीडीआर स्वीकारण्याचा पर्याय ठेवणे व याबाबत त्यांच्यात प्रबोधन करण्याचा निर्णय झाला. या कामासाठी पालिकेचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही देण्यात आली. यावेळी रमेश रिंगणे, रमजान अत्तार, बाळासाहेब सुतार, इंजि. विरूपाक्ष पाटणे, श्रीरंग राजाराम, राजकुमार कदम, सुमित धाकोजी, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती. 

कामाची दिशा... 
- रिंगरोडची मोजणी, मार्किंग करून घेणे 
- जमीन मालकांचे संघटन बांधून त्यांची बैठक घेणे 
- टीडीआर पर्यायाबाबत प्रबोधन करणे 
- नगरपालिका, नगररचना व समितीची संयुक्त बैठक घेणे 
- शासन, राजकीय नेत्यांवर सर्वपक्षीय दबाव वाढविणे 
- रिंगरोडसाठी भरघोस निधी आणणे 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com