
Almatti Dam Water Management : दोन दिवसांत कृष्णेतून पाणी वाहण्याचे प्रमाण वाढल्याने आलमट्टी धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी आलमट्टी धरण प्रशासनाने विसर्ग आणखी वाढविला. रविवारी ५० हजार क्युसेक असलेला विसर्ग सोमवारी ७० हजार क्युसेक करण्यात आला आहे, तर आवक एक लाख क्युसेकपेक्षा अधिक आहे. त्यामुळे धरणातील साठा वाढत जाऊन ७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.