
Archaeological Department Ambabai : करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे मूर्ती संवर्धन प्रक्रिया सोमवारी (ता. ११) व मंगळवारी (ता. १२) राबविण्यात येणार आहे. या कालावधीत गाभारागृह दर्शनासाठी बंद राहणार आहे. उत्सवमूर्ती व मंगल कलश पितळी उंबऱ्याच्या बाहेर ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी याचे दर्शन घेण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी शनिवारी केले आहे.