

Amababai Temple
sakal
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच मावळतीची किरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली. ती लुप्त होताना कानाकडे सरकली. यंदा ढगांचा अडथळा नसल्याने पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होत आहे.