

Kolhapur Ambabai Kiranotsav:
sakal
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यात चौथ्या दिवशी ढगांचा अडथळा आल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला नाही. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किरणांची तीव्रता कमी होती. त्याशिवाय आर्द्रतेतही वाढ झाल्याने अपेक्षित किरणे गाभाऱ्यात पोहोचू शकली नाहीत.