
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी केवळ दोन महिन्यांत तब्बल दोन कोटी सहा लाख सव्वीस हजार आठशे एकवीस रुपयांचे दान दिले आहे. मार्चच्या अखेरीस यापूर्वी दानपेट्या उघडण्यात आल्या होत्या. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळी सुटीत देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देवीच्या चरणी भरभरून दान दिले.