

पहिला दक्षिणायन किरणोत्सव सोहळा नोव्हेंबर महिन्यातील ९ ते १३ तारखेदरम्यान होतो, तर दुसरा फेब्रुवारी महिन्यात उत्तरायण किरणोत्सव सोहळा पार पडतो.
esakal
Ambabai Mandir Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा किरणोत्सव सोहळ्याला उद्या (रविवार) पासून सुरुवात होत आहे. किरणोत्सव मार्गात येणारे अडथळे शनिवारी दूर करण्यात आले. त्यामुळे सोहळ्याच्या पूर्वसंध्येला किरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली.