अमित शहांचा कोल्हापूर दौरा भाजपला पावला; कोल्हापुरात अपक्ष आमदाराचा भाजपात प्रवेश PRAKASHANNA AWADE | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PRAKASHANNA AWADE

अमित शहांचा कोल्हापूर दौरा भाजपला पावला; कोल्हापुरात अपक्ष आमदाराचा भाजपात प्रवेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पुण्यात 'शिवसृष्टी'च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं आहे. आता ते कोल्हापुरमध्ये दाखल झाले आहे. अमित शाह दौऱ्यावर येताच भाजपच्या आमदारांमध्ये वाढ झाली आहे.

कोल्हापुर जिल्ह्यातील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थित हा प्रवेश पार पडणार आहे.

आमदार प्रकाश आवाडे हे काँग्रेसचे नेते होते मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम केला. तेव्हा ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. २०१९ ला विधानसभेला ते अपक्ष म्हणून निवडून आले.

आमदार प्रकाश आवाडे हे काँग्रेसचे होते मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम केला. तेव्हा ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. विधानसभेला ते अपक्ष म्हणून निवडून आले.

आवाडे इचलकरंजी मतदारसंघातून १९८५ मध्ये विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची राज्यमंत्री पदे भूषवली. तसेच २००४ पासून कॅबिनेटपदी बढती मिळून वस्त्रउद्योग व माजी सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून कार्यभार तसेच सिंधूदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून आल्याने. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार राहिला नाही त्यामुळे पक्षाला बळ देण्यासाठी आवाडेंना गळाला लावलं आहे. आवाडेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे. आवाडेंना भाजप जिल्हाध्यक्षपद देखील देणार असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :Amit ShahKolhapurBjp