Kolhapur: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पत्नी सोनल शहांची खिद्रापूरला भेट; नृसिंहवाडीत श्री दत्त दर्शन घेतले

मंदिराचे पुजारी रमेश जोशी यांच्या उपस्थितीत विधिवत महापूजा झाली. कोपेश्वर मंदिराचे इतिहास अभ्यासक शशांक चोथे यांनी मंदिराचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि कोपेश्वर मंदिराचे सांस्कृतिक महत्त्व याविषयी माहिती दिली.
Sonal Shah at Shri Datt Mandir, Nrusinhwadi during her religious visit to Khidrapur
Sonal Shah at Shri Datt Mandir, Nrusinhwadi during her religious visit to KhidrapurSakal
Updated on

कुरुंदवाड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी आज खिद्रापूर येथील प्राचीन व ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिरास भेट देऊन भगवान कोपेश्वराचे दर्शन घेतले व विशेष महापूजेत सहभाग घेतला. त्यांचा हा दौरा पूर्णतः खासगी व कौटुंबिक स्वरूपाचा होता. येथील मंदिराच्या स्थापत्यकला व ऐतिहासिक महत्त्‍व व शिल्पकलेतील सांगड त्यांनी जाणून घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com