esakal | आंनदा मांगले यांची एक्झिट चटका लावणारी
sakal

बोलून बातमी शोधा

आंनदा मांगले यांची एक्झिट चटका लावणारी

आंनदा मांगले यांची एक्झिट चटका लावणारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

म्हाकवे : हमिदवाडा (ता.कागल) येथिल भाजपचे जिल्हा सरचिटणीस आनंदा दत्तात्रय मांगले (वय ४५) यांचे ह्दयविकाराने निधन झाले. कागल तालुक्यात राजकीय गटतटाच्या अस्तित्वाच्या लढाईतही भाजप पक्ष वाढविण्यासाठी तब्बल तीन दशके ते प्रयत्नशील राहिले. कागलच्या राजकीय वादळात त्यांनी दिवा लावण्याचे काम केले. सातत्याने महागाई, रेशन, ऊस दरवाढ आंदोलन, विविध विकास कामांच्या पुर्ततेसाठी प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून गोरगरीबांच्या न्यायहक्कासाठी ते नेहमी कार्यतत्पर राहत होते. दिलदारवृत्ती आणि मनमिळावू स्वभाव असणाऱ्या मांगले यांची एक्सिट गावकर्यांसह परिसरातील नागरिकांना चटका लावणारी ठरली.

गत जि.प.च्या निवडणूकीत नानीबाई चिखली मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. तर अनेक वेळा त्यांनी विधानसभा, प. स. निवडणूकांसाठीही अर्ज सादर केले होते. यामध्ये त्यांना यश मिळाले नसले तरी भाजपचे अस्तित्व कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले. अनेक वर्षांपासून ते परिसरात घरोघरी जाऊन चहापावडरचा व्यवसाय करत होते. तर गत दोन वर्षात शेती सेवा दुकान सुरू केले होते.

विश्वासहर्ता जपल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये मांगले यांची वर्णी होती. त्यांच्या निधनाबाबत भाजपसह शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

loading image
go to top