Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Anandrao Patil Chuyekar : गोकुळ दूध संघ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवले होते. त्यांच्या योगदानाची आठवण सांगताना शशिकांत चुयेकर भावुक झाले.
Anandrao Patil Chuyekar shashikant patil chuyekar gokul milk union kolhapur

Anandrao Patil Chuyekar shashikant patil chuyekar gokul milk union kolhapur

esakal

Updated on: 

Gokul Milk Union foundation history in Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीने आज (रविवारी) चुये गावातून प्रचाराचा शुभारंभ केला. गोकुळ दूध संघाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर यांच्या गावातून प्रचाराला सुरुवात करताना त्यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांनी वडिलांच्या संघर्षाला उजाळा दिला. गोकुळ वाचवण्यासाठी आनंदराव चुयेकर यांनी घरातील सोनेही गहाण ठेवले होते, अशी आठवण सांगताना ते भावुक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com