
Vantara Letter : वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे. तिच्या घरवापसीसाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था न्यायालयात एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करेल. नांदणी मठात महादेवीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा वनतारा उपलब्ध करून देईल. लोकभावनेचा आदर करून अनंत अंबानी यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी दिली.