

तिलारीच्या जंगलात आंध्रप्रदेशातील डॉक्टरचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
esakal
Tilari Forest Crime : महामार्गालगत साळिस्ते येथे सापडलेला मृतदेह श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बंगळुरू) यांचा असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. तसेच, तिलारी येथे सापडलेली मोटारदेखील त्यांचीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. रेड्डी पेशाने डॉक्टर होते. ते आंध्र प्रदेश येथे कार्यरत असल्याची नवी बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा खून आर्थिक कारणातून किंवा अन्य काही कारणांनी झाला असावा, या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रेड्डी यांच्या छातीवर, पोटात वार करून खून करण्यात आला.