
-संदीप खांडेकर
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा कधी मिळणार, हा प्रश्न आहे. काही लाभार्थ्यांचा पंधरा ते सोळा महिन्यांचा व्याज परतावा अद्याप खात्यात जमा झालेला नाही. शासनाकडून सवडीने निधी देण्याची पद्धत अवलंबली जात असल्याचे चित्र आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) लाभार्थ्यांची अडचण याहून वेगळी नाही.