मुलांमधील "अँटीसोशल' कृती धोकादायक 

"Antisocial" action in children is dangerous
"Antisocial" action in children is dangerous

इचलकरंजी : बारा-तेरा वयोगटातील मुलांनी चार वर्षीच्या मुलीवर केलेल्या अत्याचाराने इचलकरंजीसह परिसरात असलेल्या शाहूनगर, चंदूर या परिसराला मोठा धक्का बसला आहे.

अँटीसोशलची वाढणारी वृत्ती समाजालाही घातक ठरणारी असून अशा मुलांच्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कालचा धक्का सहन करीत असतानाच आज एका 18 वर्षीय मुलाने घरातच केलेली आत्महत्या सुन्न करणारी ठरली आहे. 
अल्पवयीन मुलांच्या या प्रकाराने इचलकरंजी परिसराला मोठा धक्का बसला आहे. चंदूरचा शाहूनगर परिसर हा मुख्यत: कामगार वसाहतीचा भाग आहे. चंदूर मुळ गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आणि इचलकरंजी हद्दीच्या सीमेवर असलेल्या परिसरात महाराष्ट्रासह विविध भागातून आलेल्या कामगारांनी आपल्या स्वत:चे हक्काचे घर म्हणून हा परिसर निवडला आहे.

गेल्या 20 वर्षात या भागात मोठी लोकसंख्या होत गेली. कष्टाशिवाय पर्याय नाही यातून घरातील प्रत्येक पालक कामावर आणि मुले मात्र शिक्षणाच्या प्रवाहात असेच चित्र या भागाचे आहे. 

लहान मुलांच्यातच आतापासूनच अँटीसोशल होण्याची जी वृत्ती आहे ती भविष्यात घातक ठरणार असल्याचे मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केली आहे. आपण काय करतो आणि केल्यानंतर काय होईल याची भिती अशा मुलांच्यामध्ये जवळपास नसतेच. त्यामुळे मनाला वाट्टेल तो प्रकार करण्याचा प्रयत्न या मुलांच्याकडून होतो. मुलांची ही मानसिकता पालकांनीच वेळेवर समजून घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे. एकूणच सद्यस्थितीत वाढता मोबाईलचा वापर, विविध इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून दाखवले जाणारे प्रकार याचाच अधिक प्रभाव या मुलांच्यावर पडत आहे. त्यामुळेच असे घृणास्पद प्रकार पुढे येत आहे. 

आठवीतच मोबाईल 
मुलांना मोबाईल देण्याची प्रवृत्ती पालकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आठवी आणि नववीमध्ये असतानाच आज मोबाईलचा वापर मुलांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेल्या पाहणीत 80 टक्के मुलांच्याकडे आठवी व नववीला असतानाच मोबाईल असल्याचे मानसपोचार तज्ञांना जाणवले आहे. हे समाजाला घातक ठरत आहे. 

काय केले तर काय होईल याची भिती नसणारीच मुले या कृतीपर्यंत पोहचतात. यासाठी पालकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. एकूणच त्यांच्या मनातील नकारात्मक वृत्ती आणि समाजाला सतत डिस्टर्ब करण्याची कृती अशा मुलांच्यामध्ये अधिक असते. 
- डॉ. संदेश पाटील, मानसोपचार तज्ज्ञ 

कोल्हापूर

कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com