
Arabian Sea Weather
esakal
किनारी भागातील हवामान बदल – देवगड तालुक्याच्या किनाऱ्यावर अधूनमधून जोरदार सरी कोसळत असून, अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
मच्छीमारी विस्कळीत – छोट्या मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळले असून, मासळीची आवक मंदावल्याने बाजारात परिणाम दिसतो आहे.
सुरक्षिततेसाठी नौकांची गर्दी – परराज्यातील अनेक मच्छीमारी नौका सुरक्षिततेसाठी देवगड बंदरात आश्रयाला आल्या असून, यामुळे किनारपट्टी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
Coastal Weather Update : देवगड तालुक्याच्या किनारी भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अरबी समुद्रातील संभाव्य वादळसदृश स्थितीमुळे सर्वार्थाने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या येथील नैसर्गिक सुरक्षित बंदरात परराज्यातील मच्छीमारी नौका सुरक्षितता म्हणून आश्रयाला आल्या आहेत. यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, किनारी भागात पावसाळी वातावरण कायम आहे.