Panhala Fort : पन्हाळगडावर शिवभक्त एकवटले, मद्यपार्टीनंतर पुरात्तव विभागाला धरलं धारेवर

आज या दारुड्यांविरोधात एल्गार करताना पन्हाळगडावर अनेक शिवभक्त एकवटले आहेत.
panhala fort
panhala fort
Summary

आज या दारुड्यांविरोधात एल्गार करताना पन्हाळगडावर अनेक शिवभक्त एकवटले आहेत.

तीनही ऋतु पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या किल्ले पन्हाळगडावर नेहमीच लोकांची रीघ असते. दरम्यान, सध्या पावसाळ्यानिमित्त अनेक लोकांनी किल्ल्यावर गर्दी केली आहे. मात्र गुरुवारी किल्ल्यावरील एक ठिकाणी काही पर्यटकांनी मद्य प्राशन करत पार्टी केल्याची माहिती समोर आली होती. गडावर अशा प्रकारांना बंदी असताना या पर्यटकांनी हे कृत्य कसे काय केले असे म्हणत शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.

आज या दारुड्यांविरोधात एल्गार करताना पन्हाळगडावर अनेक शिवभक्त एकवटले आहेत. गडावरील झुणका भाकर केंद्रांमध्ये काही पर्यटकांनी मद्य प्राशन केल्याचे समोर आले होते. दरम्यान, संतापलेल्या शिवभक्तांनी एकत्र येत या सर्व प्रकाराला विरोध करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. किल्ल्यांच्या पडझडीवरून झोपी गेलेल्या पुरातत्व विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

panhala fort
'ते' परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहा, रावतेंचा शिंदे गटावर हल्ला

सोशल मीडियावर या मद्य पार्टी करणाऱ्यांचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. दरम्यान, यामुळे आता राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी पन्हाळा प्रशासन आणि पुरात्तव विभागाला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गडाच्या संवर्धन जबाबदारीचे पालन आणि गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे. यात काही मागण्यांचाही उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रातील शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. मात्र पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवभक्त हे चांगलेच नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूज ढासळला होता. गेल्यावर्षीही त्या ठिकाणी बुरुज ढासळण्याची घटना घडली होती.

panhala fort
Politics : सामतांकडून कदमांची पाठराखण; 'रामदासभाईंनी सेनेसाठी तुरुंगवास भोगलाय ते दुःख महत्त्वाचं'

यावर पुरातत्त्व खात्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने शिवभक्त संतापले आहेत. गडावरील विभागाचे कार्यालयही बंद अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडकडून या संदर्भामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. या ठिकाणी जर कार्यालय पुरातत्त्व विभागाचे कार्यालय सुरू नाही झालं, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. आता या प्रकारानंतर तरी पन्हाळा प्रशासन आणि पुरातत्त्व खात्याला जाग येणार का असा सवाल या शिवभक्तांकडून विचारण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com