Politics : सामतांकडून कदमांची पाठराखण; 'रामदासभाईंनी सेनेसाठी तुरुंगवास भोगलाय ते दुःख महत्त्वाचं'

आमदार उदय सामंत यांचे प्रतिपादन; सेनेचा ५२ वर्षांचा मांडला अनुभव
konkan political news
konkan political news

रत्नागिरी - रामदास भाई यांनी शिवसेनेसाठी प्रसंगी तुरुंगवासही भोगलेला आहे. त्यांनी जे दुःख व्यक्त केलं, ते आमच्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांनी व्यक्त करत माजी मंत्री रामदास कदम यांची पाठराखण केली आहे.
रत्नागिरी येथील पाली निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कदम यांच्यावर होत असलेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले, रामदासभाईंनी १९७८ मध्ये शिवसेनेच्या काही गोष्टींसाठी तुरुंगवास भोगलेला आहे. त्यानंतर ते खेडमध्ये आले. पाच ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना वाढवली. कोल्हापूरचे पालकमंत्री होते, संभाजीनगरमध्ये शिवसेना पक्ष वाढविला. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांची चांगली पकड होती. एकवेळी रत्नागिरीची जिल्हा परिषद शिवसेनेकडून जाईल असे वातावरण होते. त्या परिस्थितीत रामदासभाईंनी शिवसेना टिकवून ठेवण्यासाठी काम केले.

konkan political news
NCP : सदाभाऊ म्हणतात, जागतिक गणित तज्ञ म्हणून यंदाच 'नोबेल' मिटकरींना; राष्ट्रवादीकडून नाव जाहीर

स्वतःचा खर्च करून पक्ष वाढविण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत होते. बावन्न वर्षांचा अनुभव असलेल्या शिवसैनिकाने आपला अनुभव मांडला. तो सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत २०० ऐवजी १८१ मतं कशी मिळाली यावर बोलण्यापेक्षा सभागृहात १०९ ची ९८ मतं कशी झाली याचा विचार करावा असे सांगत आमदार सामंत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

शिंदे गटासंदर्भात ते म्हणाले, आम्ही अजुनही शिवसेनेतच आहोत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्यासाठी काम करत आहोत. आम्ही बंडखोरी केलेली नाही.

आमदार जाधवांशी चर्चा करेन

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील निर्णयाला स्थगिती दिल्यावरुन आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार उदय सामंत म्हणाले की, भास्कर जाधव हे आमचे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत, माझ्या खात्याबाबतच्या निर्णयांना कुठेही स्थगिती नाही. मात्र तरी देखील स्वतः भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करेन, त्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, शेवटी ते विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आहेत.

konkan political news
Ministry of Railway : रेल्वेचा प्रवास आता स्वस्त होणार, रेल्वे मंत्रालय लवकरच भाड्यात सूट देण्याची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com