esakal | बाप रे ; चिकन ६५ खाल्ले अन् पैसे मागितले म्हणून फुकट्यांचा तलवारीने हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

attack on Chicken 65 owner in kolhapur

हल्लेखोरांनी त्यांची अडीच हजार रोकडही हिसकावून नेली.

बाप रे ; चिकन ६५ खाल्ले अन् पैसे मागितले म्हणून फुकट्यांचा तलवारीने हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पैसे मागितल्याच्या कारणावरून तिघांनी तलवार, एडकासह केलेल्या सशस्त्र हल्ल्यात हातगाडी व्यावसायिक जखमी झाला. आकाश शानूर महिलांदे (वय २३, कारंडेमळा) असे जखमीचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्यांची अडीच हजार रोकडही हिसकावून नेली. ताराबाई पार्कात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः अनिकेत सूर्यवंशी, तुषार कुमठे व त्याचा साथीदार (सदर बाजार परिसर) अशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आकाश महिलांदे यांनी ताराबाई पार्कात आदर्श चिकन ६५ नावाची हातगाडी सुरू केली. गुरुवारी रात्री मोपेडवरून तिघे गाडीवर आले. त्यांनी चिकन ६५ खाल्ले. आकाश यांनी पैसे मागताच तिघांना राग आला. त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याच खिशातील अडीच हजार रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर लाकडी बांबूने मारहाण करून निघून गेले.

हे पण वाचापालकांनो सावधान ! तुमची मुलं नाहीत ना, फाळकूटदादांच्या संर्पकात ? 

काही वेळानंतर ते पुन्हा तेथे आले. तलवार, लोखंडी एडका व दगड घेऊन ते तिघे आकाश यांच्या अंगावर धावून गेले. हे पाहून आकाश यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तिघांनी पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या पाठीत, हाताच्या बोटाना, कोपऱ्याला दुखापत झाल्याची फिर्याद जखमी आकाश महिलांदे यांनी दिली. याबाबत तपास सहायक पोलिस निरीक्षक गाडे करीत आहेत.

हे पण वाचातरीही ती हरली नाही जिद्द ! दुचाकी मॅकेनिक पूजा बनली कुटुंबाचा आधार  


संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top