esakal | Kolhapur : जंगली वनस्पतीपासून आकर्षक कलाकृती
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : जंगली वनस्पतीपासून आकर्षक कलाकृती

Kolhapur : जंगली वनस्पतीपासून आकर्षक कलाकृती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : अनेक तरुण विविध ध्येयाने झपाटलेले असतात. यापैकीच एक अक्षय घोरपडे. आजरा, चंदगडसह जिल्ह्यातील विविध जंगलात आढळणाऱ्या विविध स्थानिक वनस्पतींपासून ते आकर्षक कलाकृती साकारत आहेत. ठराविक आकाराच्या काचपात्रातील (टेरेरियम) या कलाकृतीला मेट्रोसिटीत मागणी वाढती आहे. यामुळे हॉर्टीकल्चरमधील विद्यार्थ्यांना व्यवसायाची एक संधी या कलाकृतीकडे पाहता येईल. घोरपडेंच्या हातून घडणारे टेरेरियम कलाकृती राज्यातील बहुतांशी मेट्रोसिटीत पोहोचत आहेत.

हेही वाचा: IPL 2021: CSKचा 'प्ले-ऑफ्स'मध्ये दणक्यात प्रवेश! हैदराबाद OUT

येथील कडगाव रोडवर त्यांच्या या कलाकृतीची कार्यशाळा आहे. सेंद्रीय शेतीच्या प्रसारात त्यांना खास रस आहे. कृषी विभागातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांत ते सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यास जातात. बीएस्सी (हॉर्टीकल्चर) केलेल्या घोरपडे यांना विविध छंद आहेत. त्यापैकीच एक टेरेरियमचा छंद. गडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागात टेरेरियम हा नवा प्रकार आहे. परंतु, मेट्रोसिटीमध्ये या कलाकृतींना प्रचंड मागणी आहे. सुशोभिकरण, आकर्षकता वाढवण्यासाठी त्याचा वापर होतो. कार्पोरेट कार्यालये, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये त्याचा वापर अधिक होतो.

विशेषत: शहरात टेरेरियम करणारे अनेकजण असतात. परंतु त्यासाठी ते शोभीवंत झाडांचा अधिक वापर करतात. घोरपडे यांच्या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील चंदगड, आजरा, शाहूवाडी, राधानगरी आदी जंगलामधील स्थानिक वनस्पतींचा त्यासाठी वापर केला जातो. विशेषत: कमी कालावधीत वाढणाऱ्या वनस्पतींचा यासाठी वापर केला जातो. काचपात्रात या वनस्पती ठेवताना विशिष्ट प्रकारची कलाकृती तयार केली जाते.

हेही वाचा: "मला टॅग करु नका, मी मुख्यमंत्री नाही"; भारताचा गोलकीपर वैतागला

कोको पीठ, कोळशाचा वापर

कलाकृती करताना कोको पीठ, कोळसा पावडर वापरुन त्यात आकर्षक पद्धतीने वनस्पती लावली जाते. त्यात रंगीत दगडही वापरले जातात. जेणेकरुन त्याची आकर्षकता वाढावी. या भागातील मशरुम, विविध प्रकारचे शेवाळ, स्थानिक वनस्पती, गवत, पावसाळ्यातच उगवणारे विविध फूलझाडांचा वापर ते टेरेरियमसाठी करतात. यामुळे त्यांच्या कलाकृतीला पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी जातात. ते स्वत: गार्डन डिझाईन करतात. सेंद्रीय पद्धतीने टेरेसवर किचन गार्डची रचनाही ते करतात.

loading image
go to top