esakal | घरकुल वादातून मावशीचा खून; कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार 

बोलून बातमी शोधा

घरकुल वादातून मावशीचा खून; कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार 

पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना सात दिवसांची कोठडी मिळाली..

घरकुल वादातून मावशीचा खून; कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार 
sakal_logo
By
डी. आर. पाटील

शिरोळ (जि. कोल्हापूर) : मंजूर घरकुलात कुणी राहायचे, या वादातून एका तरुणाने मित्राच्या मदतीने मावशीचा खून केला. हा प्रकार टाकवडे (ता. शिरोळ) येथे रविवारी रात्री घडला. या हल्ल्यात अंजना चंद्रकांत शिंदे यांचा मृत्यू झाला. शिरोळ पोलिसांनी या प्रकरणी गणेश गोपाळ गायकवाड (वय 27) आणि त्याचा मित्र प्रतीक बाबासाहेब पाटील (दोघेही रा. टाकवडे) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. गणेशने मावशीवर कोयत्याने तर पाटीलने दांडक्‍याने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत शिरोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संशयित गणेशने आजीच्या नावाने मंजूर झालेल्या घरकुल योजनेतून घराचे बांधकाम केले होते. बांधकाम करीत असताना त्याने घरकुल योजनेतून मंजूर रकमेपेक्षा दोन लाख रुपये अतिरिक्‍त खर्च केले होते. 
नव्या बांधलेल्या घरात गणेश आपल्या आई-वडिलांसह राहण्यास आला होता. 
तेव्हापासून, अंजना व गणेश यांच्यात वाद सुरू होता. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नवीन घरात राहण्यावरून जोरदार भांडण व शिवीगाळ झाली. त्या रागातून गणेशने अंजना यांच्या डोक्‍यावर, हातावर, तोंडावर कोयत्याने वार केले. या वेळी गणेशचा मित्र प्रतीक पाटीलनेही अंजना यांला दांडक्‍याने मारले. त्यामध्ये अंजना गंभीरने हिने शिरोळ पोलिस ठाण्यात गणेश व प्रतीकविरोधात फिर्याद दिली आहे. शिरोळ पोलिसांनी दोघांनाही रात्रीच अटक केली. सहायक जखमी झाल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
रविवारी रात्री उशिरा अंजना यांची मुलगी अमृता माने हिने पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
पोलिस निरीक्षक नवनाथ सुळ तपास करीत आहेत. अटक केलेल्या दोघांना सोमवारी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.