
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील काही मोठ्या दवाखान्यांनी स्वतःच औषधे बनवली आहेत. ही औषधे दवाखान्यांमधील दुकानांमध्ये (फार्मसी) मिळतात. ती ज्या किंमतीला आहेत, त्या किंमतीला खरेदी करावी लागतात. मात्र तोच ड्रग असणारी अन्य कंपन्यांची औषधे बाजारात कमी किमतीत मिळतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे पहावीत, किमतीतील फरक पाहून खरेदी करावीत. जेणेकरून त्यांना चांगली औषधे कमी किमतीत उपलब्ध होतील.