कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामीण भाषेतून प्रबोधन, संस्कार वाहिनीवरून गावागावांत जागर

Awakening In Rural Language For Corona Prevention Kolhapur Marathi News
Awakening In Rural Language For Corona Prevention Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : कोरोनाची महामारी सर्वत्र वाढतच आहे. कोल्हापूर जिल्हाही त्यातून सुटलेला नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन आहे. या कालावधीत कोरोनाविषयीची लोकांच्या मनातून असलेली भीती घालवणे आणि कोरोनापासून बचावासाठी ग्रामीण भाषेतून प्रशासनाने तयार केलेल्या ऑडिओ क्‍लिपद्वारे गावागावांत प्रबोधन केले जात आहे. खेडोपाडी संस्कार वाहिनीवरून हे ऑडिओ क्‍लिप प्रसारित करून कोरोनाला लांबच ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. शहरासह ग्रामीण भागातील गावागावांतही कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. समूह संसर्गाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाउन जाहीर झाला असून लोकांनीच हा लॉकडाऊन हातात घेतला आहे. यामुळे लॉकडाऊन यशस्वी होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेही बंद असल्याने रस्ते शहरातील सुनेसुने आहेत.

गावागावातही व्यवहार ठप्प झाले आहेत. एकीकडे लॉकडाऊनचे हे चित्र असतानाच रुग्ण संख्या अटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबवित आहे. त्यातलाच एक भाग म्हणून कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी नागरिकांना करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रबोधन केले जात आहे. त्यासाठी ऑडीओ क्‍लिप तयार करून ग्रामपंचायतींना दिले आहे. 

या ऑडीओ क्‍लिपमधून कोरोनाला स्वत:पासून लांब ठेवण्यासाठी काढा पिण्याचे आवाहन करून तो कसा तयार करायचा, याचेही धडेही दिले आहेत. गरम पाण्याची वाफ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम गोळ्यांचेही सेवन करण्याचा जागर या क्‍लिपमधून केला जात आहे. रोज सकाळी व सायंकाळी गावातील संस्कार वाहिनीवरून हे क्‍लिप प्रसारीत करण्याच्या सूचना प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले आहे.

ग्रामीण ढंग आणि भाषेतून तयार केलेल्या या क्‍लिप लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. मास्क वापरण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज न वापरणाऱ्या नागरिकांवर व दुकानदारांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com