esakal | प्रबोधनात्मक उपक्रमांसह  रक्तदात्यांना आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

प्रबोधनात्मक उपक्रमांसह  रक्तदात्यांना आवाहन 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध तालीम संस्था, मंडळांबरोबरच संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांवर भर देण्यात आला आहे.

प्रबोधनात्मक उपक्रमांसह  रक्तदात्यांना आवाहन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध तालीम संस्था, मंडळांबरोबरच संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांवर भर देण्यात आला आहे. मात्र, शिबिर घेताना कोरोना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेत ही शिबिरे होणार आहेत. 
आम आदमी पार्टीतर्फे रक्तदान सप्ताहाचे आयोजन केले असून कालपासून या सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता. 25) वर्षानगर येथील लाईफस्टाईल अपार्टमेंट, बुधवारी (ता.26) शाहूनगर येथील कोरगांवकर बिल्डींग, शुक्रवारी (ता.28) राजलक्ष्मीनगर, शनिवारी (ता.29) राजारामपुरी, रविवारी (ता.30) रेड्याची टक्कर परिसरातील फॅम-कॅम कॅफे येथे सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत ही शिबिरे होतील. रविवारी (ता.30) नवीन वाशी नाका येथील श्री लॉनसमोरील "सॉलिसिटर' अपार्टमेंटमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत शिबिर होणार आहे. या शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले आहे. 

कोरोनावर मास्क 
डिझाईन व पेंटींग स्पर्धा 

जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटलतर्फे जागतिक युवा दिन व गणेशोत्सवाच्या निमित्ताने मास्क डिझाईन, पेंटिंग, जीआयएफ, मिम्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. 28 ऑगस्टपर्यंत या कलाकृती पाठवायच्या आहेत. मास्क डिझाईन व पेंटींगसाठी "एचआयव्ही एड्‌स व कोवीडचा सार्वजनिक आरोग्यास धोका' हा विषय असून विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, सातशे, पाचशे आणि तीनशे अशी बक्षीसे असतील. "एचआयव्ही एड्‌स व कोवीड' या विषयावर जीआयएफ व मिम्स स्पर्धा होणार आहे.

loading image
go to top