कोल्हापूरात फसवणुकीबाबत ‘सायबर दिंडी’तून प्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur
कोल्हापूरात फसवणुकीबाबत ‘सायबर दिंडी’तून प्रबोधन

कोल्हापूरात फसवणुकीबाबत ‘सायबर दिंडी’तून प्रबोधन

कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांसह(cyber crime) आर्थिक फसवणुकीबाबत ‘सायबर दिंडी’ उपक्रमातून नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या(college students) माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील तालुके, आठवडा बाजार, जत्रा येथे यासंबंधी पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. जिल्हा पोलिस दलाच्या पुढाकारातून ही जनजागृती करण्यात येणार आहे.जिल्हा पोलिस दलातर्फे(kolhapur police) पोलिस वर्धापन दिनअंतर्गत दरवर्षी सप्ताहभर विविध उपक्रम राबवले जातात. शालेय विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यांची भेट, येथील शस्त्रांची माहिती, पोलिस दलाचे कामकाजचे स्वरूप सांगितले जाते. सध्या सायबर गुन्ह्यांचे आणि आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढू लागले आहे. लॉटरी लागली आहे. कॅश बॅक मिळवून देतो, चांगल्या पगाराची नोकरीसाठी कागदपत्रे पाठवा, बँकेतून बोलतोय केवायसीची माहिती द्या, अशी वेगवेगळी आमिषे दाखवून पासवर्ड, ओटीपी प्राप्त करून नागरिकांना गंडा घालणारी यंत्रणा वाढू लागली. (Awareness campeign about cyber fraud in Kolhapur )

हेही वाचा: World No Tobacco Day: माझे नाव आनंद, खऱ्या अर्थाने घरी आनंद आला...

जादा परतावा देतो, साखळी पद्धतीत गुंतवणूक करून चांगला परतावा घ्या, अशी आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढू लागलेत. अशा स्वरूपाच्या फसवणुकीचे प्रमाण कमी करायचे असेल तर सर्वसामान्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस वर्धापन दिनानिमित्त ‘सायबर दिंडी’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. सायबर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून याअंतर्गत पथनाट्य सादर केली जाणार आहेत. शहराच्या विविध भागांसह, तालुक्याच्या ठिकाणी, आठवडी बाजारासह जत्रा आदी ठिकाणी ही पथनाट्ये सादर करून सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप, फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आदीबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे.

हेही वाचा: Kolhapur Crime News: इचलकरंजीतील संजय तेलनाडे अखेर पुण्यात जेरबंद

शहरासह जिल्ह्यात पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. यामधून सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसंबंधी नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल.

- शैलेश बलकवडे,

पोलिस अधीक्षक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top