

Ajara Politics
sakal
आजरा: नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस उजाडला तरी आजऱ्यात अजूनही राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ थांबलेले नाही. भाजपचे नेते व सत्ताधारी गटाचे अशोक चराटी यांच्या विरोधात दोन्ही कॉंग्रेसचे गट, जुना भाजप, आजरा अन्याय निवारण समिती, मुस्लिम समाजातील दोन गट अशी आघाडी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.