esakal | ना नफा, ना तोटा; मुस्लिम बांधवांसाठी बकऱ्यांचा पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

histroy of bakri eid

ना नफा, ना तोटा; मुस्लिम बांधवांसाठी बकऱ्यांचा पुरवठा

sakal_logo
By
- मतीन शेख

कोल्हापूर : ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद (Bakari Eid 2021)हा मुस्लिम बांधवांचा (Muslims brother) महत्त्वाचा सण. या सणास बलिदानाचा इतिहास आहे. बकरी ईदला कुर्बानीच्या इतिहासाचे दरवर्षी स्मरण केले जाते. कोल्हापुरातील (Kolhapur)काही मुस्लिम बांधव एकत्र येत ‘दिन और दुनिया’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गरजू मुस्लिम बांधवांसाठी ना नफा ना तोटा तत्त्‍वावर बकरे पुरवण्याचा उपक्रम राबवतात. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.(Bakari Eid 2021 Muslims Brother Sell in Got Kolhapurakb84)

ईद साजरी करताना मुस्लिम बांधवाकडून बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी करून त्याचे मांस गोरगरीब, नातेवाईकांना दिले जाते. सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले जाते. परंतु, यंदाही कोरोनाचे संकट आहे. सध्या मुस्लिम बांधव बाहेर जात बकरे खरेदी करण्याचे टाळत आहेत. कोल्हापुरात कर्नाटकमधून बकरे आणली जातात. परंतु कोरोना निर्बंधामुळेने कर्नाटकात जाणे जिकीरीचे असल्याचे मुस्लिम बांधव सांगतात. ही गैरसोय टळावी या उद्देशाने ‘दिन और दुनिया’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून बकरत पन्हाळकर, शकील शेख, आजम जमादार, जक्की मुल्ला, गोविंद मिठाळकर, दिलीप पाटील यांच्याकडून ना नफा, ना तोटा या तत्त्‍वावर बकऱ्यांचा पुरवठा केला जात आहे.

कोरोनामुळे आर्थिक अडचणी आहेत. या कारणाने ईद साजरी होण्याची थांबू नये या भावनेने हा उपक्रम सुरू केला आहे. बकऱ्याचे फोटो व्हॉट्स अॅप ग्रुपतर्फे मुस्लिम बांधवापर्यंत पोहचवले जातात. पसंतीनुसार बांधवांकडून खरेदी केली जाते. काही गरीब बांधवाकडे सवलतीच्या दरात हे बकरे देण्यात येतात. आतापर्यंत ३८२ बकऱ्याची विक्री केली आहे.

हेही वाचा: नियतीनं केला घात; वडिलांच्या निधनाचं ओझं घेऊन आदित्यची 'परीक्षा'

बकऱ्याचे प्रकार येथून येतात

जवारी अ.नगर, कर्नाटक

भोर शिरु- राजस्थान

ठक्कर झारखंड

कश्मिरी हिमालय

''दिन और दुनिया'' या ग्रुच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करतो. सामान्य बांधवांना ईद साजरी करता यावी या भावनेतून आम्ही या ना नफा ना तोटा तत्वावर उपक्रम राबवत आहोत.

- बरकत पन्हाळकर, ग्रुप सदस्‍य

loading image