

बाळासाहेब ठाकरे यांची अखेर इच्छा पूर्ण झाली असून इस्लामपूरचे नाव अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ करण्यात आले आहे.
esakal
Islampur New Name : इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली मागणी आज पूर्ण झाली असून, यासाठीच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अध्यादेशमुळे यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्तऐवज, पोस्ट खाते आणि रेल्वेच्या नोंदीमध्येही शहराचा उल्लेख ईश्वरपूर असा होणार आहे. या निर्णयामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांसह शहरवासीयांमधे उत्साहचे वातावरण आहे.