छंदाचे रुपांतर 550 कलाकृतीत; बांबू वस्तूंची उलाढाल कोटींच्या घरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छंदाचे रुपांतर 550 कलाकृतीत; बांबू वस्तूंची उलाढाल कोटींच्या घरात

छंदाचे रुपांतर 550 कलाकृतीत; बांबू वस्तूंची उलाढाल कोटींच्या घरात

साने गुरुजी वसाहत : बांबूपासून (bambu) तयार केलेल्या वस्तूंचा वापर ही सध्याची फॅशन आहे. घराच्या सजावटीसाठी, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि दैनंदीन गरजेच्या वस्तू म्हणून त्यांचा वापर केला जातो, जैबुन्निसा मकानदार यांचा कलात्मक बांबूपासूनच्या वस्तूनिर्मितीचा छंद आता साडेपाचशे वस्तूमध्ये रूपांतर झाला आहे. मकानदार यांच्यानंतर त्यांचा मुलगा आशपाक यांच्या बांबूच्या कारखान्यातील वस्तूंची उलाढाल चार कोटींच्या घरात पोहोचली आहे. इंजिनिअरिंग व एम.बी.ए (MBA) शिक्षण झालेल्या आशपाक यांनी आईंनी सुरू केलेल्या व्यवसायात वाढ केली आहे.

कोल्हापुरातील (kolhapur) टिंबर मार्केट परिसरात तब्बल ४० हजार स्वेअर फूट जागेत सध्या बांबूच्या कलात्मक वस्तूंच्या व्यवसाय सुरू आहे.सुरवातीला दिवाळीपुरता असलेला आकाश कंदीलचा व्यवसाय तेवढाच मर्यादित होता, पण काळ बदलत गेला, तसा नवनवीन ट्रेंड (trend) येऊ लागले. त्याबरोबर अशपाक यांच्या लक्षात आले, बांबूच्या कलात्मक वस्तूंची निर्मिती केली पाहिजे. १९८७ ला आईंनी सुरू केलेला व्यवयास पुन्हा नव्या रूपात उभा करायचा, असा आशपाकनी निश्चय केला आणि बांबूपासून कलात्मक वस्तूनिर्मितीला सुरवात केली.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

कलात्मक चहा ट्रे, चिमण्यांची घरटी, बांगड्या, कंम्प्युटर किबोर्ड, लाईट लॅम्प, खेळणी, खुर्ची, सोफासेट, बांबूचे फर्निचर, लाईटिंग सेट, बेडम, बांबूचे हॅन्डीकार्पट असे एकूण पाचशेवर वस्तू तयार करत आहेत. आपला स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून आशपाक यांनी सुरू केलेल्या वस्तूंना आठ राज्यांत व इतर देशात मागणी आहे. याचबरोबर बचत गटांच्या शेकडो महिलांना रोजगारनिर्मिती दिली आहे. या व्यवसायात आशपाक मकानदार यांचे वडील बादशहा पत्नी नाजनीन व मुलगा दायन हेही या कामात त्याच्याबरोबर काम करतात.

पर्यावरणाचा समतोल

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबूची लागवड करणे फायद्याचे आहे, कारण बांबूपासून ऑक्सिजननिर्मिती जादा होते. साहजिकच बांबूपासून तयार केलेल्या वस्तू फायद्याच्या आहेत.

हेही वाचा: पुरुषी मक्ता मोडत उंदरवाडीच्या कांबळे मावशींच्या अनोख्या धाडसाचं होतयं कौतुक

"शेतकऱ्यांनी शेतात शक्यतो बांबूची लागवड करावी. कारण बांबूपासून मोठी आर्थिक कमाई होते आणि बांबूच्या प्रत्येक गोष्टीपासून वेगवेगळ्या वस्तूंच्या निर्मितीला बळ मिळते."

- आशपाक मकानदार.

टॅग्स :Kolhapur