Kolhapur: कर्जदारांना दिलासा

रेपो रेट ‘जैसे थे’; हा अल्पविराम असा रिझर्व्ह बँकेचा दावा
RBI
RBI sakal

Kolhapur- महागाईचा दर मर्यादापातळीपेक्षा जास्त असतानाही रिझर्व्ह बँकेने रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर आहे. मे २०२२ पासून सलग सहा वेळा रेपो दर वाढवण्यात आला असून, आतापर्यंत एकूण २.५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

त्यानंतर यावेळी रेपो दरवाढीला विराम देण्यात आला आहे. आता कर्जाचे व्याजदर वाढणार नाहीत. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. पतधोरण समितीच्या द्वै-मासिक बैठकीनंतर आज हा निर्णय जाहीर करण्यात आला.

‘हा पूर्णविराम नाही, तर अल्पविराम आहे. आता व्याजदरवाढ केली नसली, तरी भविष्यात गरज भासल्यास व्याजदरवाढ करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

RBI
Best Home Loan banks: घर खरेदी करताय? गृहकर्ज देण्यात अग्रेसर आहेत ‘या’ पाच बँका!

फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर जानेवारी महिन्यातील ६.५२ टक्क्यांच्या तुलनेत ६.४४ टक्के होता. मात्र, चालू आर्थिक वर्षात महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचे दास यांनी यावेळी सांगितले. मात्र रिझर्व्ह बँकेचे महागाई दर ४ ते ६ टक्क्यांच्या पट्ट्यात आणण्याचे उद्दीष्ट कायम असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही दास यांनी स्पष्ट केले.

जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेसह अनेक संस्थांनी या आर्थिक वर्षात महागाईचा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर चालू आर्थिक वर्षासाठी, फेब्रुवारीमध्ये अंदाजित ६.४ टक्क्यांच्या तुलनेत ६.५ टक्के होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

अर्थमंत्रालयाच्या ताज्या आर्थिक सर्वेक्षणात, २०२३-२४ साठी महागाई दर सहा ते ६.८ टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

RBI
Mumbai Crime : अंधेरीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट गुन्हे शाखेकडून उध्वस्त; महिलांची सुटका

गेल्या महिन्यात, अमेरिकी फेडरल रिझर्व्हने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी पाव टक्का व्याजदरवाढ केली. मार्च २०२२ मधील जवळपास शून्य टक्क्यांवरून फेडरल फंड रेट ४.७५ ते पाच टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडनेही त्यांचे मुख्य व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकही किमान पाव टक्का व्याजदरवाढ करेल अशी अपेक्षा होती. मात्र रिझर्व्ह बँकेने व्याजदरवाढीला विराम देण्याचा निर्णय घेऊन अनेकांना दिलासा दिला आहे.

RBI
Pune: मातीकामात रमणारे विद्यार्थी अन् शिक्षक

द्वैमासिक पतधोरणातील महत्त्वाचे निर्णय

  • रेपो दरात बदल नाही, दर ६.५ टक्क्यांवर स्थिर

  • आर्थिक वाढीचा दर २०२३-२४मध्ये फेब्रुवारीमधील अंदाजित ६.४ टक्क्यांवरून वाढवून ६.५ टक्के

  • महागाई दर फेब्रुवारीमधील अंदाजित ५.३ टक्क्यांवरून घटवून ५.२ टक्के

  • रब्बीत चांगल्या उत्पादनाचा अंदाज, अन्नधान्याचे दर कमी होण्याची शक्यता

  • चालू खात्यातील तूट आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मध्यम, ती नियंत्रित राहण्याचा अंदाज

  • भू-राजकीय तणाव, जागतिक आर्थिक अस्थिरता यामुळे वाढीला धोका

  • प्रगत देशांमधील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींमुळे स्थिरतेसाठी जोखीम

  • बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष

  • धोके ओळखून नियामक यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक

  • बँकांमधील विनादावा ठेवी शोधण्याकरिता नागरिकांसाठी एकात्मिक पोर्टल स्थापन करणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com