ट्रक खरेदीसाठी बोलावून शेतकरी तरुणाला ७० हजारांना लुटले

Based on the OLX app  Robbery of a young farmer for Rs 70000
Based on the OLX app Robbery of a young farmer for Rs 70000
Updated on

नागाव (कोल्हापूर)  : ओएलएक्‍स ॲपच्या आधारे शिये फाटा येथे वाहन खरेदीसाठी बोलावून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील शेतकरी तरुणाची ७० हजार रुपयांची लूट केली. चिंतामणी संजय मडिवाळ (वय ३१) असे त्यांचे नाव आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर काल (ता. ५) दुपारी दीडच्या सुमारास शिये फाटा येथे हा प्रकार घडला. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी :

ओएलएक्‍स ॲपवर ट्रक विक्रीची जाहिरात होती. यात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मडिवाळ यांनी संपर्क साधला. त्या वेळी समीर नावाच्या व्यक्तीने आपण एजंट आहे, तुम्ही गाडी पाहण्यासाठी एका फायनान्स कंपनीच्या शिये फाटा येथील गोदामाजवळ या, असे सांगितले. मडिवाळ शिये फाटा येथे आले; तेव्हा तीन जण त्यांची वाट पाहत होते. 


त्यातील एकाने खांद्यावर हात ठेवून बोलत बाजूला नेले. दरम्यान, सोबत असलेल्या दोघांनी ७० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून मोटारसायकलवरून बंगळूरच्या दिशेने पोबारा केला. त्यांच्या मागे धावेपर्यंत बोलणाराही पळून गेला. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur
Sankeshwar Banda Road Toll Plaza nitin gadkari
Gadhinglaj water pipeline burst news
Kolhapur Shocker: ₹7,000 Loan Leads to ₹1.5 Lakh Extortion and Abuse Allegations
Marathi News Esakal
www.esakal.com